शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:49 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : १६-१७ एप्रिलला समितीचे राष्ट्रीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.शनिवारी आमदार निवास येथे समितीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, राजू नागुलवार, विष्णूजी आष्टीकर, विजया धोटे, रंजना मामर्डे, अ‍ॅड. सुरेश वानखेडे , राजेंद्र आगरकर, मुकेश मासूरकर, अभ्युदय कोसे, भय्यालाल माकडे, रमेश गजबे आदींसह राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.येत्या १६ व १७ एप्रिल रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात विदर्भ संसदही होईल; सोबतच व्यापार व उद्योगजगत, विदर्भ व शेतकरी समस्या यावर कविसंमेलन, गीतगायन, महिलांच्या समस्या, विदर्भाचे घसरते औद्योगिकीकरण व घसरता रोजगार यावर चर्चा होईल. अधिवेशनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हावार आढावाही यावेळी घेण्यात आला. रोजगारासाठी युवकांचे स्वतंत्र आंदोलनविदर्भातील कंपन्यांमध्ये विदर्भातील युवकांनाच रोजगार मिळावा, यासाठी युवकांचे स्वतंत्र आंदोलन यापुढे उभारण्याचा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. बाहेरच्या व्यक्तींना रोजगार देणाऱ्या कंपन्यांपुढे आंदोलन करण्यात येईल. युवकांना रोजगार द्या किंवा बेरोजगारी भत्ता मिळावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात येईल.

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन