विदर्भ एक्स्प्रेस होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 09:30 PM2020-10-08T21:30:16+5:302020-10-08T21:31:58+5:30

Vidarbha Express , Nagpur News गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे.

Vidarbha Express will leave from home platform | विदर्भ एक्स्प्रेस होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार

विदर्भ एक्स्प्रेस होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ११ ऑक्टोबरला आपल्या नियोजित वेळेनुसार सकाळी ७.२० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर येणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सोडण्यात येणार आहे. परंतु परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस सकाळी ८.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येणार आहे. प्रवाशांना दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसमध्ये पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश देण्यात येणार आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश देण्यात येणार असून प्रवासात मास्क, फेस कव्हर घालणे, थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवासाच्या दोन तास आधी रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक आहे. प्रकृती ठीक असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

Web Title: Vidarbha Express will leave from home platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.