शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात संत्राबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:58 IST

विदर्भातही गारपीट व अवकाळीने बळीराजाचे कंबरडे मोडले. संत्राबागा, खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा यांचा शेतातच चिखल झाला.

- अविनाश पगाडे /वीरेन्दकुमार जोगी/ज्ञानेश्वर मुंदे/ प्रशांत हेलोंडे/रवी जवळे/मनोज ताजने /इंद्रपाल कटकवार नागपूर : विदर्भातही गारपीट व अवकाळीने बळीराजाचे कंबरडे मोडले. संत्राबागा, खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा यांचा शेतातचचिखल झाला. अमरावतीत कांदा, गव्हाचे नुकसान अमरावती जिल्ह्यात पहाटे झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रब्बी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) या शेतकºयाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे परिसरात भरारी पथकातील डॉक्टर अहीरकर व डॉ. शेख गारपिटीत जखमी झाले. ग्वरूड तालुक्यातील वाई येथे सात जनावरे वीज पडून दगावली, तर तुटलेल्या जिवंत तारांच्या स्पर्शाने एका बैलाचा मृत्यू झाला. गारपिटीने संत्रा पिकासह गहू, हरभरा, कांदा, तूर पिकांचे नुकसान झाले. केळीबागांनाही फटका बसला. अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी व वरूड येथील संत्राबागांचे नुकसान झाले. गव्हाला फटका बसला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. चांदूरबाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्यासह रविवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. आमदार अनिल बोंडे, रमेश बुंदिले यांनीही गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.यवतमाळमध्ये पावसाच्या सरी कोसळल्यायवतमाळला १० वाजेच्या सुमारास वादळासह पावसाला सुरुवात झाली. पुसद, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, घाटंजी, यवतमाळ तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. महागाव तालुक्यातील गुंज, बिजोरा, डोंगरगाव येथे जोरदार पाऊस झाला.गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरला वादळी वाºयासह पाऊसगोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वीज पडल्याने विनोद कुसन गावळकर (२८,रा. जेठभावडा) हा तरुण ठार झाला असून, जसवंता रूपलाला वाघाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघेही शेतात काम करीत होते. गडचिरोलीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. वर्धा जिल्ह्यात सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आर्वी, आष्टी कारंजा तथा वर्धा तालुक्यातील पिकांना फटका बसला.नागपूरला वीज कोसळून ४ जखमी-नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून, मिरची, हरभरा, गहू आणि तुरीला जबर फटका बसला आहे. वीज पडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आश्रयाला बसलेले ३ मजूर व ट्रॅक्टरचालक चौघे जखमी झाले.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस