पोटनिवडणुकीत विजय काँग्रेसचा जल्लोष
By Admin | Updated: September 17, 2014 00:57 IST2014-09-17T00:57:38+5:302014-09-17T00:57:38+5:30
उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. कार्यक र्त्यांत उत्साह संचारला

पोटनिवडणुकीत विजय काँग्रेसचा जल्लोष
नागपूर : उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. कार्यक र्त्यांत उत्साह संचारला असून मंगळवारी देवडिया काँग्रेसभवनापुढे फटाक्यांची आतषबाजी करून घोषणा देत विजयाचा जल्लोष केला.
देशभरातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर, रत्नाकर जयपूरकर, संदेश सिंगलकर आदी पदाधिकारी देवडिया काँग्रेसभवन येथे पोहचले. ठाकरे यांच्या नेतृत्वात विजयी जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी व सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
जल्लोषात तनवीर अहमद, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा, ब्लॉक अध्यक्ष नाना झोडे, दिनेश बानाबाकोडे, विलास बांगरे, प्रवीण आगरे, परमेश्वर राऊ त,नगरसेविका सरस्वती सलामे, वासुदेव ढोके, अमान खान, अमित पाठक, भावना लोणारे, कमाल अन्सारी, कृष्णा गोटाफोडे, सत्यनारायण जेरपोत, सुनील गुलगुलवार, सुखदेव मनोहर, अविनाश साखरे, मन्सूर अख्तर , अनिल मछले, बबन दुरुगकर, सुभाष भोयर, अतिक कुरेशी, रमेश ठाकरे, शेषराव नगरारे, मामा राऊ त, रमेश ठाकरे, रमेश चौकीदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्य्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)