शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रकचालकाने घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:49 IST

एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देयशोधरानगरात अपघाताने तणाव : आरोपी ट्रकचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.आबिद अन्सारी मोहम्मद जमाल (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुंदनलाल गुप्तानगरात राहत होता. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आबिद मोटरसायकलने कुंदनलाल गुप्तानगरातून कळमन्यात जात होता. राजीवनगर उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची मोठी गर्दी असते. असे असूनही आरोपी ट्रकचालक अविनाश दशरथ येरवार (वय २५, रा. बोधवडी, किनवट, जि. नांदेड) याने निष्काळजीपणे ट्रक चालवून समोरून येणाऱ्या आबिदच्या मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे आबिद गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित करण्यात आले.या अपघातामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर मोहम्मद जावेद अन्सारी (वय २९) यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी ट्रकचालक येरवारला अटक केली.अपघातात आणखी एकाचा बळीजयताळा परिसरात राहणारे राहुल दत्ताराम कुलकर्णी (वय ४१) यांचा अपघाती मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ११. ते ११.३० च्या सुमारास ते एमआयडीसीतून घराकडे येत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाºयावर त्यांची दुचाकी गेली. त्यामुळे तोंडाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना हिंगण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी संजय परूनाथ दाताळीकर (वय ३१, रा. एनआयटी गार्डन जवळ) यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू