शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रकचालकाने घेतला एकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:28 IST

अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देसंतप्त जमावाने कळमन्यात रोखली वाहतूक : पोलीस पोहचले दीड तासानंतर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला.शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास पारडी नाक्याजवळच्या कापसी खुर्द जवळ एका ट्रकचालकाने एका व्यक्तीला जोरदार धडक मारली. या अपघातात ती व्यक्ती ठार झाली. त्यामुळे जमाव संतप्त झाला. अपघात झाल्याची आणि ट्रकचालक पळून गेल्याची माहिती जमावातील काहींनी कळमना पोलिसांना कळवली. मात्र, पोलीस तब्बल दीड तास विलंबाने पोहचले. तोपर्यंत मृत व्यक्ती तशीच रस्त्यावर पडून होती. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे जमाव संतप्त झाला त्यांनी तेथे टायर जाळून आणि वाहतूक अडवून आपला संताप व्यक्त केला. जोरदार नारेबाजीही केली. प्रचंड तणाव निर्माण झाला असताना कळमना पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जमावाची कशीबशी समजूत काढून मृतदेह तेथून रुग्णालयात हलविला. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या भागात प्रचंड वाहतूक असते. मात्र, पोलिसांचे नियंत्रण नसल्याने तिकडे नेहमीच छोटेमोठे अपघात घडतात. कळमना पोलीस अशाच प्रकारे नेहमी हलगर्जीपणा दाखवतात. हे नेहमीचेच झाल्याने जमावाच्या भावना आज रात्री तीव्र झाल्या होत्या.अपघातात वृद्धाचा करुण अंत  लग्नाच्या पत्रिका वाटत असताना एका दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने अब्दुल रहिम खान (वय ६३, रा. ताजनगर टेका) यांचा करुण अंत झाला. १५ एप्रिलला सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू