सामूहिक बलात्कारातील पीडितेला देत होते नशेच्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST2021-09-04T04:11:52+5:302021-09-04T04:11:52+5:30

नागपूर : अपहरण करून सामूहिक बलात्कार करणारे आरोपी अल्पवयीन विद्यार्थिनीला नशा आणि गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालत होते. कुटुंबातील सदस्यांचा ...

The victim of the gang rape was given intoxicating pills | सामूहिक बलात्कारातील पीडितेला देत होते नशेच्या गोळ्या

सामूहिक बलात्कारातील पीडितेला देत होते नशेच्या गोळ्या

नागपूर : अपहरण करून सामूहिक बलात्कार करणारे आरोपी अल्पवयीन विद्यार्थिनीला नशा आणि गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालत होते. कुटुंबातील सदस्यांचा खून करण्याची धमकी तसेच पिस्तुलाच्या धाकावर मारहाण केल्यामुळे विद्यार्थिनी यातना सहन करीत होती. या प्रकरणात एका युवतीसह इतर दोन-तीन जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. परंतु मानकापूर पोलिसांच्या भूमिकेमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना सत्यस्थिती पुढे येईल की नाही, याची शंका वाटत आहे.

मार्च २०२० मध्ये १७ वर्षाच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यात मंगेश नामदेव हुडके (३२), नीलेश ब्रिजलाल सिंह ठाकूर (४५) आणि आकाश राजेश खोटे (२९) हे अटकेत आहेत. मंगेश विद्यार्थिनीचा नातेवाईक आहे. त्याने ठाकूरच्या मदतीने हे कृत्य केले. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान विद्यार्थिनीचे अपहरण करून वेळोवेळी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तिला जबलपूरमध्ये आपल्या आजी-आजोबांकडे पाठविले. तेथे रक्षाबंधनासाठी पीडितेचे वडील गेले असता त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पीडित विद्यार्थिनीला कारमध्ये बसवून शहरापासून दूर एका घरात आणि फार्म हाऊसमध्ये नेत होते. तेथे पीडितेला जबरदस्ती गर्भपात आणि नशेच्या गोळ्या देत होते. त्यानंतर विद्यार्थिनी बेशुद्ध होत होती. शुद्धीत आल्यानंतर तिला आरोपी समोर दिसत होते. विद्यार्थिनीला काही वेळा एक युवती आणि इतर दोन-तीन युवक संशयास्पद स्थितीत दिसले होते. आरोपींनी पिस्तूल दाखवून, मारहाण करून आणि सिगारेटचे चटके देण्याची धमकी दिल्यामुळे विद्यार्थिनी घाबरली होती. आरोपी तिला जेथे नेत होते तेथे ते नेहमीच अनैतिक कृत्य करीत होते. डोळ्यावर पट्टी बांधून आणि दारू पाजून तिला तेथे नेत असल्यामुळे विद्यार्थिनीला त्या जागेची माहिती नाही. विद्यार्थिनीच्या मते त्या जागी नेहमीच संशयास्पद व्यक्तींची ये-जा राहत होती. आरोपी मोठ्या रॅकेटशी निगडित असण्याची शंका आहे. कठोरपणे चौकशी केल्यास सत्यस्थिती बाहेर येणार आहे. पीडित मानकापूर पोलिसात गेल्यानंतर आरोपींचे काही समर्थक तेथे आले होते. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांना पाहून ते आल्यापावली परतल्याची माहिती आहे.

.............

Web Title: The victim of the gang rape was given intoxicating pills