शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतींचा दौरा अन् पोलीस भवनचे उद्घाटन, बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 21:18 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २९ एप्रिलला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एनएडीटीला भेट देणार आहे.

नागपूर : एकीकडे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्यपालांचा दाैरा तर दुसरीकडे पोलीस भवनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह राज्य मंत्रीमंडळातील सुमारे अर्धा डझन मंत्र्यांची शुक्रवारी सकाळपासून शहरात उपस्थिती राहणार असल्याने पोलिसांना बंदोबस्ताचे दुहेरी नियोजन करावे लागले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २९ एप्रिलला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एनएडीटीला भेट देणार आहे. काही वेळ त्यांचा मुक्काम राजभवनात राहणार आहे. त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेसुद्धा राहणार आहेत. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्ताचे वेगळे तर उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या संबंधाने पोलिसांनी बंदोबस्ताचे दहेरी नियोजन केले आहे. त्यानुसार, आज पोलीस अधिकाऱ्यांच्या सकाळपासून मेरॉथॉन बैठका चालल्या. 

दुपारी १.३० ते ३.४५ या वेळेत उपराष्ट्रपतींच्या दाैऱ्याची रंगिता तालिम (रिहर्सल) पोलिसांनी करून घेतली. त्यानुसार, अग्निशमन दल, अॅम्बुलन्ससह विविध विभागांचा समावेश असलेल्या वाहनांचा काफिला विमानतळ, राजभवन, एनएडीटी ते विमानतळ या मार्गावर धावल्या. या वेळी कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कुठे राहिल, कोण कुठे काय भूमीका बजावतील, त्यासंबंधानेही सूचना देण्यात आल्या.

दोन हजार पोलीस बंदोबस्तात तैनात-

शुक्रवारच्या या दाैऱ्याच्या बंदोबस्तासाठी ७५० वाहतूक शाखेच्या पोलिसांसह सुमारे २ हजार पोलिसांचा ताफा तैनात केला जाणार आहे. विमानतळ, राजभवन आणि एनएडीटी या मार्गावरची वाहतूक दाैऱ्याच्या वेळी रोखली जाईल.

जड वाहतूक बंद-

वाहतूक पोलिसांकडून दौऱ्याच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत वर्धा ते नागपूर मार्गावरची संपूर्ण जड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त राहणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस