उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:47 IST2019-10-31T00:46:57+5:302019-10-31T00:47:28+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.१५ वाजता आगमन झाले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.१५ वाजता आगमन झाले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.
विमानतळावर खा. डॉ. विकास महात्मे, एअर मार्शल आर. के. एस. शेरा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत केले.