उपराष्ट्रपती आज नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:04 AM2020-01-10T10:04:59+5:302020-01-10T10:13:07+5:30

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे शुक्रवार १० जानेवारी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.

Vice President at Nagpur today | उपराष्ट्रपती आज नागपुरात

उपराष्ट्रपती आज नागपुरात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे शुक्रवार १० जानेवारी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सुरेश भट सभागृह येथील आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. शुक्रवार १० जानेवारी रोजी सकाळी  हैदराबाद येथून नागपूर विमानतळावर भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने उपराष्ट्रपतींचे आगमन होईल. नागपूर विमानतळावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर सुरेश भट सभागृहाकडे मोटारीने प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृह येथील कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी १२ वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी १२.३० वाजता विशेष विमानाने तिरुचिरापल्लीकडे प्रयाण करतील.

Web Title: Vice President at Nagpur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.