कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:56+5:302021-08-12T04:11:56+5:30

नागपूर : वाईट हेतूने अधिकारांचा दुरुपयोग केल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक ...

Vice Chancellor Dr. Take action against Subhash Chaudhary | कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई करा

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध कारवाई करा

नागपूर : वाईट हेतूने अधिकारांचा दुरुपयोग केल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई व्हावी, याकरिता पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातील प्रा. मोहन काशीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने मंगळवारी विद्यापीठाचे कुलपती व इतरांना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रा. काशीकर दोनवेळा पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागप्रमुख राहिले आहेत. दरम्यान, ९ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्याकडे मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला होता. परंतु, काशीकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, चौधरी यांनी चिडून ३१ जुलै २०२१ रोजी इतिहास विभागातील प्रा.डॉ. श्यामराव कोरेटी यांची पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. तसेच, ३ ऑगस्ट २०२१ रोजी काशीकर यांच्याविरुद्ध गैरवर्तणुकीचे आरोप निश्चित करून विभागीय चौकशीचे निर्देश दिले, असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. याशिवाय, चौधरी यांची ही कृती बेकायदेशीर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. काशीकर यांच्या वतीने ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

-----------------

विभागीय चौकशीवर स्थगिती

उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, काशीकर यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, प्रा. कोरेटी यांना राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून कोणत्याही कार्यवाहीत सहभागी होण्यास मनाई केली.

Web Title: Vice Chancellor Dr. Take action against Subhash Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.