शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘विहिंप’ प्रार्थनास्थळ अतिक्रमण कारवाईवरुन करणार भजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 18:11 IST

न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असून या मुद्द्यावरुन ‘विहिंप’नेदेखील प्रशासनाविरोधात आघाडी उघडली आहे. प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भजन आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन डॉ.प्रवीण तोगडिया यांनी  स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशासनाला देणार घरचा अहेर : तोगडिया प्रणित आंतरराष्ट्रीय हिंदू परिषददेखील करणार निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असून या मुद्द्यावरुन ‘विहिंप’नेदेखील प्रशासनाविरोधात आघाडी उघडली आहे. प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भजन आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन डॉ.प्रवीण तोगडिया यांनी  स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकूणच या मुद्द्यावरुन दोन्ही संघटना विरोधाचे जास्तीत जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे कारण पुढे करून महापालिका व नासुप्र प्रशासनाने शहरातील मैदाने, ले-आऊ टमधील धार्मिक स्थळे तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे धार्मिक भावनांना धक्का बसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. मागील रविवारी सर्वधर्मिय समिती तसेच शहरातील विविध लोकप्रतिनिधींनी गडकरी यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्यानंतर गडकरींनीदेखील प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्र लिहून लोकवस्तीतील प्रार्थनास्थळे न पाडण्याची सूचना केली होती.त्यानंतर कारवाई काहीशी थंडावली असताना विहिंप व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून या मुद्द्यावरुन आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. ‘विहिंप’, बजरंग दल व मंदिर बचाओ संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौकात सायंकाळी ५ वाजता भजन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे तर राज्य शासनाविरोधातच आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम येथून निदर्शनांना सुरुवात होणार आहे.

टॅग्स :HinduहिंदूEnchroachmentअतिक्रमण