शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ज्येष्ठ पत्रकार जैमिनी कडू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:44 IST

ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे शनिवारी रात्री नागपुरात निधन झाले.

ठळक मुद्देबहुजन चळवळीला जबर धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचे शनिवारी रात्री नागपुरात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शैल जैेमिनी, मुलगा संघर्ष आणि मोठा आप्त परिवार आहे. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी उपचारादरम्यानच त्यांची मृत्यूसोबत असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीसह अन्य सामाजिक चळवळींना धक्का बसला. लोकमतच्या सुरुवातीच्या काळात ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. प्रा.जैमिनी कडू हे ५ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास घरी जात असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात कडू यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.

वादळाची झुंज अखेर संपली :   आज मेडिकलला करणार देहदान

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे आंदोलन असेल किंवा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निर्मितीचा संघर्ष. पत्रकारितेतील झुंजार कारकीर्द असेल किंवा अध्यापनाचा प्रदीर्घ प्रवास. ते कधी झुकले नाहीत की थकले नाहीत. पण, एका बेसावध क्षणी काळाने डाव साधला आणि प्रा. जैमिनी कडू नावाचे हे वादळ शमले. रुग्णालयात दाखल व्हावे लागले. येथे या लढवय्या कार्यकत्र्याने आपल्या स्वभावानुसार तब्बल १३ दिवस मृत्यूशी संघर्ष केला. पण, अखेर या वादळाची झुंज संपली अन् शनिवारी संध्याकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ पत्रकार आणि बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचा विविध सामाजिक संघटनांशी जवळचा संबंध होता. लोकमतच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.प्रा. जैमिनी कडू यांचा विविध सामाजिक चळवळीत सहभाग होता. यात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, १९७१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्माण आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या समाजविधायक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. यामध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचा राष्ट्रीय प्रचारक, अधिवेशनांमध्ये महनीय वक्ता म्हणून सहभाग आणि सत्यशोधक सन्मान, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातर्फे देण्यात येणारा गुणवंत पुरस्कार आदींचा समावेश आहे. यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे ते पदाधिकारी होते. यात विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखेचे सचिव, भारतीय श्रमिक पत्रकार संघ नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड नागपूरचे सल्लागार आणि कुणबी समाज दर्पण या मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बहुजन चळवळीतील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. शनिवारी नागपुरात आयोजित ओबीसी महा हुंकार परिषद रद्द करण्यात आली. प्रा. जैमिनी कडू यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव मेडिकलच्या शवविच्छेदनगृहाजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सोपविण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :Journalistपत्रकारDeathमृत्यू