बिघडलेल्या रईसजाद्यांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:22+5:302021-02-05T04:49:22+5:30
उपरोक्त आरोपींना आणि त्यांच्या पालकांना शोधून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासमोर उभे करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी त्यांना कडक शब्दात झापले. ...

बिघडलेल्या रईसजाद्यांची वाहने जप्त
उपरोक्त आरोपींना आणि त्यांच्या पालकांना शोधून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासमोर उभे करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी त्यांना कडक शब्दात झापले. कारवाईची तंबी दिली. यावेळी आरोपींचे पालक भवितव्याचा विचार करण्यासाठी कोणताही गुन्हा दाखल करू नका, अशी विनवणी करीत होते.
----
आरोपींची वाहने जप्त
दरम्यान, स्टंटबाजी करणारी चारही वाहने वाहतूक पोलिसांनी जप्त केली. त्यातील एक वाहन मॉडीफाईड करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या सर्व वाहनधारकांवर मोठा आर्थिक दंड लावला जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी लोकमतला सांगितले. किमान महिनाभर तरी ही वाहने पोलिसांच्या ताब्यात राहतील. अशा वाहनचालकांना (कार, दुचाकी) वठणीवर आणण्यासाठी शहरात शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
----
अनेकांचा जीव वाचला
ज्यावेळी हे बिघडलेले रईसजादे स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करीत होते. त्यावेळी पुलावर अनेक गरिबांची मुले उभी होती. थरारक कसरती पाहून ती मुले अगदी पुलाच्या कठड्याला चिपकून बराच वेळ जीव मुठीत घेऊन उभी राहिली. कारच्या टपच्यावर असलेल्या खिडकीतून अर्धे शरीर बाहेर काढून हे उपद्रवी त्यावेळी आरडाओरड करीत होते.
-----