वाहन चाेरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:02+5:302021-04-20T04:09:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : चाेरीला गेलेली माेटरसायकल हुडकून काढण्यात आली. ती चाेरून नेणाऱ्या चाेरट्यांना अटक करण्यात कुही ...

वाहन चाेरट्यांना अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : चाेरीला गेलेली माेटरसायकल हुडकून काढण्यात आली. ती चाेरून नेणाऱ्या चाेरट्यांना अटक करण्यात कुही पाेलिसांना घटनेच्या महिनाभरानंतर यश आले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अडम-हुडपा मार्गालगत १५ मार्च राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आराेपींना रविवारी (दि. १८) अटक केली. त्यांच्याकडून माेटरसायकल जप्त करण्यात आली असून, ती मालकाच्या सुपूर्द करण्यात आली.
अर्जुन संजय सोनवाणे (२२) व गणेश विश्वनाथ क्षीरसागर (२८) दोघेही रा. रेवराल (टोली), ता. मौदा, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. रामू सहादेव शेंडे रा. कटारा, ता. कुही हे १५ मार्च राेजी त्यांच्या एमएच-३१/डीडी-६००१ क्रमांकाच्या माेटरसायकलने अडम-हुडपा मार्गाने साळवाहून कटारा येथे जात हाेते. वाटेत त्यांनी माेटरसासयकल राेडलगत उभी केली आणि शाैचास गेले. दरम्यान, चाेरट्यांनी ती माेटरसायकल चाेरून नेली. त्यामुळे रामू शेंडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली.
पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. ही माेटरसायकल अर्जुनने चाेरून नेल्याची माहिती पाेलिसांना मिळाल्याने, पाेलिसांनी त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव सांगितले. त्यामुळे दाेघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीची माेटरसायकल जप्त केली, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली असून, या चाेरट्यांकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही व्यक्त केली. ही कामगिरी पाेलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, समाधान पवार, संदीप गुटे, अमोल झाडे यांच्या पथकाने बजावली.