भरधाव वाहनाची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:49+5:302021-05-15T04:08:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : भरधाव अज्ञात वाहनाने कारला जाेरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू ...

The vehicle hit the car | भरधाव वाहनाची कारला धडक

भरधाव वाहनाची कारला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : भरधाव अज्ञात वाहनाने कारला जाेरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील रिंगणाबाेडी शिवारात शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

संजय रामनारायण जयस्वाल (५२, रा. गिरीपेठ, नागपूर) असे मृत कारचालकाचे नाव आहे. त्यांचा पारडी, नागपूर येथे बार व रेस्टारंट आहे. ते एमएच-३१/डीके-९३३३ क्रमांकाच्या कारने अमरावतीहून नागपूरला येत हाेते. दरम्यान, रिंगणाबाेडी शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जाेरात धडक दिली आणि वाहन निघून गेले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

कारची अवस्था बघता टिप्परसारख्या जड वाहनाने धडक दिली असावी, अशी शक्यता ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी व्यक्त केली. संजय जयस्वाल त्यांच्या काेराेनावर मात केलेल्या नातेवाइकाला साेडून देण्यासाठी अमरावतीला गेले हाेते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रभू ठाकरे करीत आहेत.

Web Title: The vehicle hit the car