भाजीविक्रेत्याला दुचाकीचालकाने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:47+5:302021-02-05T04:48:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जरीपटक्यात एका भरधाव दुचाकीचालकाने भाजीविक्रेत्याला जोरदार धडक मारल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, लकडगंजमध्ये बोलेरो ...

The vegetable seller was blown up by a two-wheeler | भाजीविक्रेत्याला दुचाकीचालकाने उडविले

भाजीविक्रेत्याला दुचाकीचालकाने उडविले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जरीपटक्यात एका भरधाव दुचाकीचालकाने भाजीविक्रेत्याला जोरदार धडक मारल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, लकडगंजमध्ये बोलेरो व्हॅनचालकाने सायकलस्वाराचा बळी घेतला. हे दोन्ही अपघात सोमवारी घडले.

जरीपटक्यातील अपघातात ठार झालेल्याचे नाव दागोजी सोमाजी वाहने (वय ६०) आहे. ते नागार्जुन कॉलनीत राहत होते. जरीपटक्यातील खोब्रागडे चौकातील डीपीजवळ ते हातठेल्यावर भाजी विकायचे. नेहमीप्रमाणे दिवसभर भाजीविक्री केल्यानंतर रात्री ८च्या सुमारास ते बाजूच्या टपरीवर चहा प्यायला गेले. चहा घेऊन परत आपल्या भाजीच्या ठेल्याकडे येत असताना त्यांना एमएच ४९- बीपी३५६९ क्रमांकाच्या स्प्लेंडरचालकाने वेगात दुचाकी चालवून जोरदार धडक मारली. त्यामुळे दागोजी गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन जखमी दागोजींना मेयोत उपचारांसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रीती सुनील डोंगरे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी स्प्लेंडरचालकाची चाैकशी केली जात आहे.

बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार ठार

दुसरा अपघात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १२च्या सुमारास घडला. ईश्वर भाग्यवली शाहू (वय ६३, रा. डिप्टीसिग्नल) घरगुती सामान घेऊन सायकलने वर्धमाननगरातून जात होते. बोलेरो पिकअप व्हॅनच्या चालकाने त्यांना सुदर्शन चौकाजवळ जोरदार धडक मारून गंभीर जखमी केले. नागरिकांनी त्यांना मेयोत दाखल केले असता उपचारादरम्यान सोमवारी दुपारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: The vegetable seller was blown up by a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.