नागपुरात भाज्यांचे भाव आकाशाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:26 AM2018-06-08T01:26:06+5:302018-06-08T01:26:16+5:30

शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.

Vegetable prices in Nagpur at the sky | नागपुरात भाज्यांचे भाव आकाशाला भिडले

नागपुरात भाज्यांचे भाव आकाशाला भिडले

Next
ठळक मुद्देटोमॅटो चारपट वाढले : शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आवक घटली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.
कळमना व कॉटन मार्केटमध्ये १५ दिवसांपूर्वी १०० रुपयांचा क्रेट आता ३०० ते ४०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात पूर्र्वीच्या १० रुपयांच्या तुलनेत आता टोमॅटोचे भाव २० ते २५ रुपयांवर गेले आहेत. याचप्रकारे अद्रक घाऊक बाजारात ८० ते १०० रुपये विकल्या जात आहे. एक महिन्यापूर्वी ३० ते ४० रुपये भाव होते.५ ते ६ रुपये किलो वांगे आता १५ ते २० रुपयांवर गेले आहेत. याशिवाय चवळी व गवार शेंग, सिमला मिरची, कारले, वांगे, कोथिंबीर, बटाटे, भेंडीचे भाव तिप्पट झाले आहेत.
देशाच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव दुप्पट-तिपटीवर गेले आहेत. विशेषत: टोमॅटोचे भाव चारपट वाढले आहेत.चे आंदोलन सुरू आहे. त्यांचा थेट परिणाम भाज्यांच्या वाहतुकीवर पडल्यामुळे आणि बाजारात आवक कमी झाल्याने कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये भाज्यांचे भाव दरदिवशी वाढत आहेत. किरकोळ बाजारातही भाज्यांची आवक कमी झाली आहे.
कोथिंबीर ७० रुपये किलो
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून कोथिंबीर, चवळी व गवार शेंग, बटाटे आणि भेंडीची आवक होते. पण काही दिवसांपासून शेतकºयांच्या आंदोलनाने आवक मंदावली आहे. त्यामुळे या भाज्या महागल्या आहेत. पूर्वी १० रुपये किलो विकणारी कोथिंबीर आता ६० ते ७० रुपयांवर पोहोचली आहे. आता छिंदवाडा येथून केवळ कोथिंबीर येत आहे. बाजारात पत्ता कोबी, कोहळे व लवकी स्वस्त भावात आहे.

भाज्यांची किंमत (किलो)
टोमॅटो ३०० ते ४०० रुपये क्रेट
अद्रक ८० ते १०० रु.
फणस ७० ते ८० रु. किलो
चवळी शेंग ४० ते ५० रु.
गवार शेंग ४० रु. किलो
सिमला मिरची ४० ते ५० रु.
वांगे १५ ते २० रु.
कोथिंबीर ६० ते ७० रु.

Web Title: Vegetable prices in Nagpur at the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.