शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आठवड्यात उतरले भाज्यांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 20:02 IST

Vegetable prices down, Nagpur News गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते.

ठळक मुद्देकिरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोवर : कोथिंबीर १२० रुपये

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. सध्या मिरची ६० तर कोथिंबीर १०० ते १२० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात पालक भाजीचे भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सध्या ३० रुपयांपर्यंत उतरले आहेत. वांगे, फूलकोबी, पत्ताकोबीचे भाव आटोक्यात आहेत. स्वयंपाकघरात कमी किमतीच्या भाज्यांची रेलचेल दिसून येत आहेत.फूलकोबी काही प्रमाणात औरंगाबाद आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून येत आहे. पावसामुळे कोथिंबीर शेतातच खराब झाल्याने अजूनही आवक फार कमी आहे. त्यामुळे भाव १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे. सध्या लातूर, बुलडाणा, नांदेड येथून कोथिंबीर तर लवकी भिलई, राजनांदगाव येथून येत आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली असून पीक ऑक्टोबरअखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. सध्या कॉटन मार्केटमध्ये गेल्या आठवड्याच्या ३० ते ३५ गाड्यांच्या तुलनेत आवक दुप्पट झाली आहे. पुढे आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. याशिवाय कळमना सब्जी मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्यांची आवक आहे. सध्या दोन्ही ठोक बाजारात शहराला होणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत पुरेशी आवक आहे.

शनिवारी किरकोळमध्ये भाज्यांचे  भाव कोथिंबीर १०० ते १२०, हिरवी मिरची ५०, टमाटर ४०, वांगे २०, सिमला मिरची ७० ते ८०, तोंडले ५०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी २५ ते ३०, दोडके ४० ते ५०, लवकी ३०, कोहळे ३० ते ३५, चवळी शेंग ४० ते ५०, गवार ५०, चवळी भाजी ४० ते ५०, पालक ३० ते ४०, मेथी ७० ते ८०, परवळ ६० ते ७०, कारले ५०, भेंडी ४० ते ५०, काकळी ३०, गाजर ५०, मुळा ४०.

टॅग्स :vegetableभाज्याnagpurनागपूर