लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते.हे कार्यकर्ते अगदी सकाळीच गांधीबाग उद्यानात पोहोचले. येथे त्यांनी व्हॅलेंटाईन डे ला विरोध दर्शवित जोरदार नारेबाजी केली. यानंतर गाढवांना शोधून त्यांच्या गळात माळा टाकण्यात आल्या. या कार्यकर्त्यांनी या मुक्या जनावरांचा अक्षरश: छळ करीत त्यांना परिसरात फिरवले. व्हॅलेंटाईन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे आणि आपले तरुण उगाच या दिवसाच्या उदात्तीकरणात गुंतले आहेत. त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत असल्याचे दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु अशा विरोधासाठी जनावरांचे हाल का करता, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे कुठलेच उत्तर नव्हते.
नागपुरात वीर बजरंगी दलाने लावले गाढवांचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:42 IST
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते.
नागपुरात वीर बजरंगी दलाने लावले गाढवांचे लग्न
ठळक मुद्देजनावरांवर अत्याचार : विरोधाची ही कुठली पद्धत?