ग्रामीण भागात ग्रामसभेचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST2021-01-03T04:09:59+5:302021-01-03T04:09:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : खापा (ता. सावनेर) परिसरातील काही गावांमध्ये ८ ते १० महिन्यांपासून एकही ग्रामसभा घेण्यात आली ...

Vavade of Gram Sabha in rural areas | ग्रामीण भागात ग्रामसभेचे वावडे

ग्रामीण भागात ग्रामसभेचे वावडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : खापा (ता. सावनेर) परिसरातील काही गावांमध्ये ८ ते १० महिन्यांपासून एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना ग्रामसभेचे वावडे असल्याने स्थानिक विकास कामांसाेबतच नागरिकांच्या विविध समस्या साेडविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत व ग्रामसभा याला विशेष महत्त्व आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा घेणे अनिवार्य असते. यात नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झालेला व खर्च केलेल्या निधीचे विवरण मागता येते. शिवाय, गावांमधील समस्यांवर चर्चा करून त्या साेडविण्यासाठी याेग्य निर्णय घेता येताे. विकास कामांचे नियाेजन करणे शक्य हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात तीन पेक्षा अधिक ग्रामसभा आयाेजित केल्या जात नाही. त्याही ग्रामसभांमध्ये नागरिकांची उपस्थिती कमी राहात असल्याने त्या प्रसंगी स्थगित कराव्या लागतात. त्यानंतर घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पदाधिकारी त्यांच्या साेयीचे निर्णय घेऊन माेकळे हाेतात.

या ग्रामसभा काेराेना संक्रमणामुळे घेणे शक्य झाले नाही, अशी माहिती काही गावांमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. काेराेना संक्रमण कमी हाेत असल्याने ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयाेजन करावे, अशी मागणीही ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

...

आर्थिक अडचणी वाढल्या

ग्रामपंचायतींना लाेकसंख्या व त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे शासनाकडून वित्त आयाेगाच्या माध्यामातून विकास निधी दिला जाताे. याच निधीतून ग्रामपंचायती पाणीपुरवठा व पथदिव्यांची विजेची बिले भरत असून, विकास कामेही करतात. काेराेना संक्रमणामुळे बहुतांश ग्रामपंचायतींची करवसुली फारच कमी झाली. त्यामुळे त्यांना १५ व्या वित्त आयाेगातून फारसा भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. निधीअभावी ग्रामीण भागातील दलितवस्तीसह अन्य ठिकाणीची विकास कामे ठप्प आहेत.

Web Title: Vavade of Gram Sabha in rural areas