म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्ध्यातून उत्पादन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST2021-05-28T04:07:13+5:302021-05-28T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. या आजाराला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅम्फोटेरेसिन ...

Vardha production of injections on mucormycosis begins | म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्ध्यातून उत्पादन सुरू

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्ध्यातून उत्पादन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. या आजाराला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यातून सुरू झाले आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर कंपनीतर्फे इंजेक्शन्सचे नमुन्यांचे सादरीकरण करण्यात आले. सोमवार (दि. २४) पासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे.

अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता वर्ध्यात याचे उत्पादन व्हावे या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. १४ मे रोजी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन निर्मितीची महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली. वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे. हे इंजेक्शन कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे फायदेशीर आहे. कच्चा माल उपलब्ध झाला तर या इंजेक्शनची निर्मितीही वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही, असे जेनेटिक लाईफ सायन्सेसचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: Vardha production of injections on mucormycosis begins