वंदेमातरम् गीताने चांगले संस्कार, स्फूर्ती निर्माण होते
By Admin | Updated: August 17, 2014 00:50 IST2014-08-17T00:50:13+5:302014-08-17T00:50:13+5:30
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी अग्निकुंड पेटवून बलिदान दिले. याच बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्याची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी नागपूर महापालिका

वंदेमातरम् गीताने चांगले संस्कार, स्फूर्ती निर्माण होते
श्याम वर्धने : महापौर चषक वंदेमातरम् स्पर्धा
नागपूर : स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी अग्निकुंड पेटवून बलिदान दिले. याच बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्याची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी नागपूर महापालिका दरवर्षी महापौर चषक वंदेमातरम देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे आयोजन करते. यातून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीपर भावना निर्माण होण्यास मदत होते. कारण वंदेमातरम गीताने चांगले संस्कार, स्फूर्ती निर्माण होते, अशी भावना महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी महापौर चषक वंदेमातरम स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केली.
नागपूर महापालिकेच्यावतीने आयोजित वंदेमातरम समूहगान स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला. स्पर्धेचे बक्षीस वितरण उपमहापौर जैतुनबी अन्सारी व आयुक्त श्याम वर्धने यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, परीक्षक गिरीश वऱ्हाडपांडे, बी.डी. भुरे, विजया मांजरे, राजेंद्र गोल्हर, ज्ञानेश्वर महाले, विनोद मांडवकर, अरुणा ढोरे आदी उपस्थित होते. यावर्षी स्पर्धेत ८२ शाळांनी भाग घेतला होता.
१८ शाळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.तिन्ही गटात अंतिम फेरीत साऊथ पॉईंट शाळेने अव्वल मानांकन मिळविले. संचालन अरुणा गावंडे, मंजुषा फुलंबरकर यांनी केले. (प्रतिनिधी)