शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

‘राजगृहावरील’ तोडफोड आंबेडकरी विचारांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 21:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी मंगळवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत तोडफोड केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरातही या घटनेमुळे समाजात असंतोष पसरला आहे. रिपाइं, काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला.

ठळक मुद्देराजकीय पक्षांसह विविध संघटनांनी नोंदवला निषेधआरोपींना तातडीने अटक करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी मंगळवारी काही समाजकंटकांनी हल्ला करीत तोडफोड केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरातही या घटनेमुळे समाजात असंतोष पसरला आहे. रिपाइं, काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. राजगृहावरील हा हल्ला म्हणजे आंबेडकरी विचार व महाराष्ट्राच्या अस्मितेवरील हल्ला असून यातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.काँग्रेसब्लॉक क्रमांक ९ तर्फे काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनात माटे चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तोंडाला काळे मास्क व हातावर काळी पट्टी बांधून राजगृहावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. पंकज निघोट यांच्या नेतृत्वातील आंदोलनात अजय नासरे, आकाश तायवाडे, नितीन बनसोड, चक्रधर भोयर, अभिजित जाधव, संजय तुरणकर, वैभव काळे, शुभम आमधरे, अभय सोमकुळे आदींचा समावेश होता.भाजपभारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश सचिव व मनपा विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे राजगृहावरील तोडफोडीचा निषेध करण्यात आला. यावेळी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. निदर्शनात अशोक मेंढे, नेताजी गजभिये, सतीश शिरसवान, राहुल झांबरे, विशाल लारोकर, इंद्रजित वासनिक, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, अजय करोसिया, रणजित गौरे, राजू चव्हण, अशोक डोंगरे, विनोद कोटांगळे, विराग राऊत, सुनील वाहाने, शशिकला बावने, नम्रता माकोडे, प्रदीप मेंढे, अशोक लारोकर, आकाश सबळ, विनोद ठाकूर आदींचा समावेश होता.रिपब्लिकन सेनाराजगृहाला कायमस्वरुपी सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, धर्मपाल वंजारी, राजकुमार तांडेकर, नरेंद्र तिरपुडे, शरद दढाळे, हरीश बेलेकर, जयकुमार उके, सुनिता नवगाने, रमा वंजारी आदींचा समावेश होता.दलित सेनाआरोपीला तातडीने अटक करा, अशी मागणी दलित सेनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष सूर्यमणी भिवगडे, शहर अध्यक्ष प्रमोद सहारे, भास्करराव दरवाडे, प्रशांत लखे, सुरेश तामगाडगे यांचा समावेश होता.भारतीय बौद्ध महासभाभारतीय बौद्ध महासभेने या घटनेचा निषेध करीत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात भीमराव फुसे, सी.आर. सोनडवले, आनंद सायरे आदींचा समावेश होता.आंबेडकरी संघटनाआंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांसह रिपब्लिकन पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. रिपाइं (आठवल)चे शहराध्यक्ष बाळू घरडे, राजन वाघमारे, रिपाइंचे राहुल मून, प्रकाश कुंभे, दिनेश अंडरसहारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाने, संविधान फाऊंडेशन व महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे ई.झेड. खोब्रागडे, समता सैनिक दलाचे अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर, सुनील सारीपुत्त, अ‍ॅड. स्मिता कांबळे, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील आदींसह अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.वंचित बहुजन आघाडीआंबेडकरी अनुयायींची अस्मिता दुखवून त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा व कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा उद्देश यात दिसून येतो. तेव्हा सर्व आरोपी व त्यामागील विघातक शक्ती यांना तातडीने पकडण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. आघाडीतर्फे गुरुवारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.बहुजन रिपब्लिकन एकता मंचराजगृहावरील हल्ला हा गंभीर विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून आरोपींना शिक्षा करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केली.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर