शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:09 IST

अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. 

ठळक मुद्देतगड्या शिष्टमंडळापुढे व्यक्त केली होती भावना : रा.सू. गवई, विजय दर्डा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली होती भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना एका झटक्यात त्यांनी झारखंड, छत्तीसगड व उत्तराखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती केली होती. परंतु सर्वात जुनी मागणी असलेला विदर्भ राज्य त्यांच्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांना अखेरपर्यंत होते. ती भावना खुद्द अटलबिहारी वाजपयी यांनी नागपुरातच एका तगड्या शिष्टमंडळापुढे बोलून दाखविली होती. रविवार २७ आॅगस्ट २००० रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची नापूरला जहीर सभा होती. ते शनिवारी २६ तारखेलाच नागपूरला आले होते. राजभवनावर ते थांबले होते. तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात काँग्रेस खासदरांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रिपाइंचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई, माजी खासदार विजय दर्डा , माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वातील एका तगड्या शिष्टमंडळाने राजभवनावर त्यांची भेट घेतली व चर्चा केली. उद्याच्या नागपूरच्या जाहीरसभेत पंतप्रधनांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असे आवाहन शिष्टमंडळाने केले होते. तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता विदर्भवाद्यांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेतले होते. विलास मुत्तेमवार यांनी त्या चर्चेचे प्रास्ताविक केले. विजय दर्डा तेव्हा वाजपेयींना म्हणाले ‘आपण चांगल्या मूडमध्ये आहात. विदर्भ राज्य देण्याची तुमची इच्छा आहे, तुमच्या डोळ्यात ते दिसते आहे. विदर्भाच्या जनभावना समजून घ्या आणि विदर्भाचा भरभराटीचा मार्ग प्रशस्त करा. नागपुरात आपण तशी घोषणा करा, तुमचा हा आशिर्वाद विदर्भाचे लोक सदैव लक्षात ठेवतील.’त्यावर वाजपेयी म्हणाले की, एका राज्याच्या निर्मितीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व विदर्भात आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळात विदर्भाचा ठराव समत झालेला नाही. सर्वांची सहमती होवो म्हणून तीन नवीन राज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातही तसे झाले तर माझे काम सोपे होईल. विदर्भ राज्य झाले नाही, याचे शल्य मला बोचते.विदर्भवाद्यांच्या या तगड्या शिष्टमंडळात ज्येष्ठ विदर्भवादी नेते, टी.जी. देशमुख, शंकरराव गडाम, बनवारीलाल पुरोहित, बाळकृष्ण वासनिक, सदानंद फुलझेले, उमाकांत रामटेके, प्रा. हरीभाऊ केदार, नितीन राऊत, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, देवसरकर, सुरेश देवतळे, सेवक वाघाये, गोविंदराव वंजारी, किशोर काशीकर, अशोक धवड, दमयंती देशभ्रतार, डॉ. मंशा-ऊर रहेमान, अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश गजभिये, हरगोविंद बजाज, बसंतलाल शॉ, शेख हुसैन, गोविंद रेणू, एन.के. सारडा, प्रकाश वाधवानी, आदर्श डागा, उमेश चौबे, रामराव वाघाळे, रमण पैगवार, रीना रॉय आदी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVidarbhaविदर्भ