एम्समध्ये लस पोहचली नाही, नागरिक निराश होऊन परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:09 IST2021-04-30T04:09:59+5:302021-04-30T04:09:59+5:30
नागपूर : एम्समध्ये मंगळवारी दुपारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचली नाही़ त्यामुळे नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर निराश होऊन घरी ...

एम्समध्ये लस पोहचली नाही, नागरिक निराश होऊन परतले
नागपूर : एम्समध्ये मंगळवारी दुपारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचली नाही़ त्यामुळे नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर निराश होऊन घरी परतावे लागले़ प्रशासनाच्या अनियोजनाचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला़ त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता़
एम्समधील लस २६ एप्रिल रोजीच संपल्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली होती़ त्यानंतरही एम्सला लसीचा पुरवठा करण्यात आला नाही, असे नागरिकांना सांगण्यात आले़ हे स्पष्टीकरण ऐकून नागरिक निराश झाले़ त्यापैकी अनेकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी केली होती़ त्यामुळे पुन्हा नोंदणी करावी लागेल का, एम्स प्रशासन पुढील तारीख देऊन लसीकरिता बोलावून घेईल का, असे अनेक प्रश्न ते विचारत होते़ त्याचे उत्तर त्यांना मिळाले नाही़
----------
दुपारी सुरू झाले लसीकरण
मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजता एम्सला लस देण्यात आली़ त्यानंतर घरी गेलेल्या नागरिकांना परत बोलावण्यात आले़ त्यामुळे नागरिक धावपळ करीत पुन्हा एम्समध्ये पोहचून लस टोसून घेतली़