शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लसीसंबंधी डेटा विकसनशील देशांसाेबत शेअर केला जावा; प्रा. ॲडा याेनाथ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 06:44 IST

नाेबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा याेनाथ यांनी ‘लोकमत’शी खास बातचित करताना व्यक्त केले मत

- उदय अंधारेनागपूर : वैज्ञानिक संशाेधन आणि विशेषतः काेणत्याही आजारावरील लसीच्या संशाेधनाचा डेटा विकसनशील आणि अविकसित अशा सर्व देशांना त्यांच्या गरजेनुसार प्राधान्याने शेअर केला जावा, असे मत रसायनशास्त्रातील नाेबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा याेनाथ यांनी व्यक्त केले. 

१०८ व्या इंडियन सायन्स काॅंग्रेसमध्ये सहभागी हाेण्यासाठी नागपुरात आलेल्या प्रा. याेनाथ यांनी प्रस्तुत लाेकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ‘केमिकल क्रिस्टलाेग्राफर’ अशी ओळख असलेल्या प्रा. याेनाथ या इस्रायलच्या रहिवासी आहेत. त्यांच्या मते कोणत्याही संशाेधनाचे उद्दिष्ट अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देण्याचे असते, त्यामुळे त्यात गरीब आणि श्रीमंत देश असा भेदभाव केला जाऊ शकत नाही. विकसनशील देशांविरुद्ध होत असलेला भेदभाव रोखण्यासाठी एकसमान वैज्ञानिक धोरण असावे की नाही, हे सांगणे आपल्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे त्या म्हणाल्या. 

आजाराच्या संक्रमणाची नेमकी जागा शोधणे सुरू

वैज्ञानिक समुदाय पुढच्या पिढीतील अँटिबायोटिक्स (प्रतिजैविक) च्या विकासात गुंतलेला आहे, जे सूक्ष्मजीवांच्या प्रतिकारासाठी कमी योग्य आहेत. वैज्ञानिक समुदाय नेहमीच या प्रतिकार विरुद्ध लढू इच्छितो. संशाेधकांचा ‘ फ्लोरोसेंट अँटिबायोटिक्स ’ वर संशाेधन सुरू आहे, जे आजाराच्या संक्रमणाची नेमकी जागा शोधू शकेल. काही वैशिष्ट्ये ओळखून त्यांची रचना केली जात असल्याचे प्रा. याेनाथ यांनी स्पष्ट केले. विज्ञान हा भूतकाळातील गाेष्टींवर सतत शाेध आणि सुधारणा करणारा विषय आहे आणि त्यामुळे लाेकांचे आयुर्मान वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

कोरोना विषाणू पहिला नाही, जग त्यावर नियंत्रण मिळवेल

कोविड-१९ चा विचार केल्यास हा पहिला विषाणू नाही, ज्याने धाेका निर्माण केला. यापूर्वी अनेक विषाणू आणि जिवाणूंनी कहर केला होता ; पण त्यावर नियंत्रण मिळविले गेले. कोविड विषाणूच्या बाबतीतही असेच आहे आणि मानवजात या लढ्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे संशाेधन थेट कोविडशी संबंधित नसले तरी, ज्यावर त्यांचे संशाेधन आधारित आहे, त्याच जैव रासायनिक प्रक्रियेचा वापर काेविड विराेधी लसीकरणासाठी करण्यात आला आहे. हे संशाेधन सर्व आनुवंशिक विकारांवर उपचार करण्यासाठी लस तयार करण्याचे साधन प्रदान करते.

वैज्ञानिकांची काेणतीही लाॅबी नाही

संशाेधनाच्या कामात अडथळा आणणारी आणि विज्ञानाचा विकास थांबविणारी शक्तिशाली वैज्ञानिकांची काेणतीही लॉबी नाही. हे केवळ एखाद्याच्या कल्पनेचे चित्रण होते आणि ते निश्चितच खरे नाही. - प्रा. ॲडा याेनाथ 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत