‘लसीकरण आपल्या परिसरात’ला लागणार ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:03+5:302021-05-24T04:08:03+5:30

रविवारी लस मिळाली नाही : शहरात फक्त दोन हजार डोस शिल्लक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीकरणाच्या नावावर शहरातील ...

‘Vaccination in your area’ will take a break! | ‘लसीकरण आपल्या परिसरात’ला लागणार ब्रेक !

‘लसीकरण आपल्या परिसरात’ला लागणार ब्रेक !

रविवारी लस मिळाली नाही : शहरात फक्त दोन हजार डोस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीकरणाच्या नावावर शहरातील नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाकडे लस उपलब्ध नाही. परंतु नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी लसीकरण आपल्या परिसरात मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत लस उपलब्ध झाली नाही. मनपाकडे जेमतेम दोन हजार डोस शिल्लक आहे. पात्र मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोमवारी नवीन लससाठा उपलब्ध होईल व लसीकरण आपल्या परिसरात मोहीम राबविली जाईल, अशी आशा आहे. परिस्थिती विचारात घेता साठा उपलब्ध होत नसताना मोहीम हाती घेतली ती एक औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले. ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ८५ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला. कोरोनाच्या काळात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. शहारात २०७ केंद्र असले तरी सर्व केंद्रांवर लस दिली जात नाही. याआधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थींना डोस दिले जात होते. परंतु आता हा आकडा दोन ते तीन हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ४.९० लाख लाभार्थींना पहिला डोस, तर १ लाख ६० लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे.

....

रविवारी फक्त १६४० लाभार्थ्यांना डोस

नागपूर शहरात रविवारी फक्त १६४० लाभार्थींना लस देण्यात आली. यात १३३५ लाभार्थींना पहिला, तर ३०५ लाभाथींंना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. परंतु पुरेसा साठा नसलयाने अनेकांना लसीकरण केंद्रावरून परत यावे लागत आहे.

...

डोस वाया जाण्याचा धोका

एका इंजेक्शनमधून दहा लोकांना लस देता येत असल्यामुळे किमान दहा लोक उपस्थित असणे आवश्यक आहे. जाचक नियम व अटीमुळे आता कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. डोस वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

...........

नागपूर जिल्ह्याला रविवारी कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणतीही लस मिळाली नाही.

ऑक्सिजन : रविवारी १०२ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. त्यापैकी ६६ मेट्रिक टनचे वितरण खासगी व शासकीय कोविड रुग्णालय व प्लांटसला करण्यात आले.

रेमडेसिवीर : रविवारी ५१ रेमडेसिवीर जिल्ह्याला प्राप्त झालेत. आदेशानुसार वितरण सुरू आहे.

टॉसिलीझुमॅब : रविवारी नागपूर शहरासाठी ४० टॉसिलीझुमॅब इंजेक्शन प्राप्त झाले.

अँम्फोटेरिसिन : म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असणाऱ्या अम्फोटेरिसिन बी. लिपीडच्या व्हायलचा रविवारी पुरवठा नाही.

....

Web Title: ‘Vaccination in your area’ will take a break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.