रामटेकमध्ये सहा उपकेंद्रात लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:10+5:302021-04-06T04:09:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, तालुक्यात साेमवारपासून महादुला, काचूरवाही, मुसेवाडी, वाहीटाेला, ...

Vaccination started in six sub-centers in Ramtek | रामटेकमध्ये सहा उपकेंद्रात लसीकरण सुरू

रामटेकमध्ये सहा उपकेंद्रात लसीकरण सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यात लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, तालुक्यात साेमवारपासून महादुला, काचूरवाही, मुसेवाडी, वाहीटाेला, पथरई व खुमारी या सहा उपकेंद्रांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात एकूण १४ केंद्रातून ही सुविधा मिळणार असून, बेलदा, खुमारी येथेही लवकर केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रामटेक तालुक्यात आतापर्यंत प्राथमिक आराेग्य केंद्र मनसर, भंडारबाेडी, हिवराबाजार, नगरधन, करवाही व ग्रामीण रुग्णालय रामटेक व देवलापार येथे लसीकरण केंद्र सुरू आहे. काचूरवाही येथे १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. काचूरवाही आराेग्य उपकेंद्रात साेमवारी लसीकरण माेहिमेला आ. आशिष जयस्वाल व जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार १२ एप्रिलपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी व लसीकरणाची गती वाढविण्यासाठी खंडविकास अधिकारी प्रदीपकुमार बमनाेटे यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच सर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरणाची जबाबदारी दिली आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला जात असल्याचे प्रदीपकुमार बमनाेटे यांनी सांगितले. यावेळी काचूरवाही येथील सरपंच शैलेश राऊत, तालुका आराेग्य अधिकारी चेतन नाईकवार, डाॅ. स्मिता काकडे, ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे, आराेग्यसेविका मंजू करडभाजने, पं.स. सदस्य मनाेज सहारे, माजी जि.प. सदस्य देवराव धुर्वे, शुभम कामडे, पुरुषाेत्तम बावनकुळे, प्रभाकर नाटकर, केशव माेरे, दुर्गा इडपाते, प्रल्हाद माेहनकार आदी उपस्थित हाेते.

Web Title: Vaccination started in six sub-centers in Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.