आजारी वृद्ध व्यक्तींना घरबसल्या लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST2021-07-21T04:07:11+5:302021-07-21T04:07:11+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मनपाची विशेष मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घराबाहेर पडू न शकणाऱ्या आजारी, वृद्ध नागरिकांना ...

Vaccination of sick elderly people at home | आजारी वृद्ध व्यक्तींना घरबसल्या लस

आजारी वृद्ध व्यक्तींना घरबसल्या लस

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मनपाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घराबाहेर पडू न शकणाऱ्या आजारी, वृद्ध नागरिकांना घरबसल्या कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. महापालिका यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे.

वृद्ध आणि कुठल्या तरी आजाराने ग्रस्त असलेल्या आणि घरी उपचार सुरू असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम येथे विशेष व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तसेच ग्लोकल मॉल येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून विशेष व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणसाठी https://forms.gle/NzYDUWcwQJmqsDPT8 ही लिंक शेअर करण्यात आली आहे. त्यावर जाऊन लसीकरण करायचे आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरायची आहे. आवश्यक ते कागदपत्र सोबत अपलोड करायचे आहेत. पडताळणीनंतर मनपाची या मोहिमेसाठी असलेली समर्पित टीम संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचे लसीकरण करेल.

...

नातेवाईक ठेवतील लक्ष

लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीचे नातेवाईक पुढील ३० मिनिटे त्याच्यावर लक्ष ठेवेल. आवश्यकता भासल्यास पुन्हा संबंधित मोबाईल टीमला दूरध्वनीद्वारे तब्येतीची माहिती देईल. नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Web Title: Vaccination of sick elderly people at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.