लसीकरण मिशन मोडवर राबवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:37+5:302021-03-29T04:05:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड लसीविना कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेऊन जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम मिशन ...

Vaccination run on mission mode () | लसीकरण मिशन मोडवर राबवा ()

लसीकरण मिशन मोडवर राबवा ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड लसीविना कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेऊन जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या. ६० वर्षावरील वयोवृध्द नागरिक व ४५ वर्षावरील विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस जिल्ह्यात सर्वत्र देण्यात येत आहे. या लसीकरण केंद्राला त्यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी, गुमगाव आयुर्वेदिक दवाखाना, वाडी, कामठी तालुक्यातील कोराडी येथील कोविड लसीकरण केंद्राची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, हिंगण्याचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात १२५ कोविड लसीकरण केंद्र असून ३ लाख ५० हजारांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत १ लाख ४१ हजार ८७८ असे एकूण ३३ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. एप्रिलपर्यंत सर्व लसीकरण पूर्ण करावयाचे असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

चौकट

आतापर्यंत तालुकानिहाय झालेले लसीकरण

तालुका लसीकरण

भिवापूर- ६,३५९ ,

हिंगणा- २१,१८५

कळमेश्वर- ९,२९८

कामठी- १२,३४५

काटोल- ११,३२१

कुही- ६,८२९

मौदा- ७,४९६

नागपूर- १२,५५८

नरखेड- ८,६५२

पारशिवनी- ८,४९५

रामटेक- ९,१३९

सावनेर- १५,५४०

उमरेड- १२,६६१

Web Title: Vaccination run on mission mode ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.