मनपा केंद्रांमध्ये आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:57+5:302021-07-19T04:06:57+5:30

नागपूर : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे सोमवारी १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण ...

Vaccination in Municipal Centers today | मनपा केंद्रांमध्ये आज लसीकरण

मनपा केंद्रांमध्ये आज लसीकरण

नागपूर : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे सोमवारी १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महापालिकेसह शासकीय असलेल्या १४५ केंद्रावर होणार आहे. नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत केले जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहेत. १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ड्राइव्ह ईन व्हॅक्सिनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

Web Title: Vaccination in Municipal Centers today