कडक निर्बंधानंतरही लसीकरण वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:46+5:302021-04-07T04:09:46+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ...

कडक निर्बंधानंतरही लसीकरण वेगात
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. सार्वजनिक वाहतुकीवर ५० टक्के प्रवासी क्षमतेची अट टाकण्यात आली आहे. असे असतानाही मंगळवारी लसीकरण वेगात झाले. शहरात १५,९९० तर ग्रामीण भागात २३,६१६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. ६ एप्रिलपासून रात्री ८ नंतर संचारबंदी तर दिवसाला जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. ५० टक्के क्षमतेने बस वाहतूक, रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी तर टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवेशांपैकी ५० टक्के प्रवाशांची अट टाकून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे लसीकरण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु मागील तीन दिवसांच्या तुलनेत अधिक लसीकरण झाल्याचे आज दिसून आले.
-असे वाढले लसीकरण
१ एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आल्याने लसीकरणाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या तारखेला ११,२२८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. २ एप्रिल रोजी १४,३५८, ३ एप्रिल रोजी १५,८७१, ४ एप्रिल रोजी लसीकरण अर्ध्यावर येऊन ८,१६६ झाले, तर ५ एप्रिल रोजी ९,७९४ तर आज १५,९९० झाले.
-६० वर्षांवरील १ लाख १९ हजार ८५४ लाभार्थी
५ एप्रिलपर्यंत शहरात ८.७६ टक्के लोकांनी लस घेतली. यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या १ लाख १९ हजार ८५४ लाभार्थींचा समावेश आहे. नागपूर शहरात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या ९ लाखांच्या आसपास आहे.
...
नागपूर शहरातील लसीकरण (५ एप्रिलपर्यंत)
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४०२२८
फ्रंटलाइन वर्कर - ३२८१२
४५ वर्षांवरील - २१२०५
४५ वर्षांवरील आजारी - ४८७२०
६० वर्षांवरील - ११९८५४
एकूण - २६२८३०
...
दुसरा डोस
आरोग्य सेवक - १४५८८
फ्रंटलाइन वर्कर - ६९९२
४५ वर्षांवरील - १८
४५ वर्षांवरील आजारी - १५७
६० वर्षांवरील - १३१७
एकूण - २३०७२