लक्ष्मीनगर झोनमध्ये सात ठिकाणी लसीकरण सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:08+5:302021-04-05T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लक्ष्मीनगर झोन क्षेत्रात आठ ठिकाणी सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. यात ...

Vaccination facilities at seven places in Laxminagar zone | लक्ष्मीनगर झोनमध्ये सात ठिकाणी लसीकरण सुविधा

लक्ष्मीनगर झोनमध्ये सात ठिकाणी लसीकरण सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लक्ष्मीनगर झोन क्षेत्रात आठ ठिकाणी सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. यात प्रभाग १६ मधील विवेकानंदनगर येथील बॅडमिंटन इनडोअर स्टेडियम, गजानननगर येथील समाजभवन, प्रभाग ३६ मधील राजीवनगर येथील श्री संत जगनाडे महाराज समाज भवन, सोनेगाव वस्तीजवळ समाजभवन दुर्गा मंदिर, प्रभाग ३७ मधील गायत्रीनगर येथील हनुमान मंदिर समाज भवन, सुभाषनगर रिंगरोड येथील महात्मा गांधी समाजभवन शीतलमाता मंदिरच्या बाजूला, प्रभाग ३८ मधील शिवणगाव येथील मनपा प्राथमिक शाळा आदी केंद्रांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षे वयाच्या सर्वांसाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सोबत आधार कार्ड आणून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी केले आहे.

Web Title: Vaccination facilities at seven places in Laxminagar zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.