पुरेसा साठा नसल्याने लसीकरण संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:23+5:302021-04-16T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीचा पुरेसा साठा नसल्याने ११ एप्रिलपासून नागपूर शहरातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. आधी ...

Vaccination is delayed due to insufficient stocks | पुरेसा साठा नसल्याने लसीकरण संथच

पुरेसा साठा नसल्याने लसीकरण संथच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीचा पुरेसा साठा नसल्याने ११ एप्रिलपासून नागपूर शहरातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थींना लस दिली जात होती. मागील पाच दिवसात ही संख्या ७ ते ८ हजारांवर आली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर शहराला कोविशिल्डचे ४० हजार डोस उपलब्ध करण्यात आले. हे डोस तीन दिवस पुरतील. यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला आहे.

दुसरीकडे कोव्हॅक्सिन केंद्र पूर्णपणे बंद पडले आहेत. गुरुवारी कोव्हॅक्सिनचे फक्त २२१ डोस देण्यात आले. मागणीनुसार पुरवठा नसल्याने याचा परिणाम लसीकरणावर झाला आहे.

मनपा प्रशासनाने केंद्राकडे लसीची मागणी केली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून ती उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.

...

शहरातील लसीकरण

दिनांक लसीकरण

१० एप्रिल १६४५१

११ एप्रिल ६६६६

१२ एप्रिल ९३८०

१३ एप्रिल ६७६३

१४ एप्रिल ७८२९

१५एप्रिल ८०८४

Web Title: Vaccination is delayed due to insufficient stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.