लसीकरण आज बंद, उद्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:11 IST2021-08-22T04:11:33+5:302021-08-22T04:11:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेसह सरकारी केंद्रांवर आज रविवारी (दि. २२) लसीकरण बंद राहील. मात्र उद्या सोमवारी (दि. ...

Vaccination closed today, starting tomorrow | लसीकरण आज बंद, उद्या सुरू

लसीकरण आज बंद, उद्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेसह सरकारी केंद्रांवर आज रविवारी (दि. २२) लसीकरण बंद राहील. मात्र उद्या सोमवारी (दि. २३) १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

सोमवारी प्रथम व दुसरा डोस दिला जाईल. लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरसुद्धा सोमवारी कोविशिल्डचे लसीकरण होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

तसेच सोमवारी १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामबाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल, दिघोरी येथे उपलब्ध राहील.

Web Title: Vaccination closed today, starting tomorrow