४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST2021-05-31T04:07:27+5:302021-05-31T04:07:27+5:30

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटांतील नागरिकांना ३१ मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा ...

Vaccination of citizens above 45 years of age today | ४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटांतील नागरिकांना ३१ मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी लस उपलब्ध करून दिले आहे. कोविशिल्ड लस सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे, तसेच ‘लसीकरण आपल्या परिसरात’ मोहिमेंतर्गतही कोविशिल्ड लस दिली जाईल.

केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार, ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला, त्यांना दुसरा डोज़ दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर यांनाही दुसरा डोस दिला जाणार आहे, तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थनगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Web Title: Vaccination of citizens above 45 years of age today