काटाेल तालुक्यातील लसीकरण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:08 AM2021-04-13T04:08:50+5:302021-04-13T04:08:50+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना प्रतिबंधक काेव्हॅक्सिन व काेविशिल्ड या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने काटाेल तालुक्यातील सर्व लसीकरण ...

Vaccination center in Katail taluka closed | काटाेल तालुक्यातील लसीकरण केंद्र बंद

काटाेल तालुक्यातील लसीकरण केंद्र बंद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना प्रतिबंधक काेव्हॅक्सिन व काेविशिल्ड या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने काटाेल तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. याला तहसीलदार अजय चरडे यांनी दुजाेरा दिला आहे. तालुक्यात १० एप्रिलपर्यंत ३० हजार नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.शशांक व्यवहारे यांनी दिली.

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. काेराेना लस ही संक्रमण राेखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असली, तरी लसीकरणाचा वेग वाढताच लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची पंचाईत झाली आहे. लसीकरणाला गती यावी म्हणून काटाेल शहरात दाेन तर ग्रामीण भागात १४ अशी एकूण १६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले हाेते. या सर्व केंद्रांवर १० एप्रिलपर्यंत तालुक्यातील एकूण ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.शशांक व्यवहारे यांनी दिली.

तालुक्यातील काेराेना लसींचा साठा दाेन दिवसांपासून संपल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे लसींची मागणी नाेंदविण्यात आली असून, साठा उपलब्ध हाेताच, लसीकरण माेहिमेला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली. या लसीबाबत पसरविण्यात येत असलेल्या अफवा आणि नागरिकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात अधिकारी, लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जनजागृती केली जात आहे.

Web Title: Vaccination center in Katail taluka closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.