डाेसच्या मर्यादित उपलब्धतेने लसीकरण प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST2021-06-26T04:07:58+5:302021-06-26T04:07:58+5:30
नागपूर : लसीकरणासाठी नागपूरवासी तयार आहेत. विशेषत: तरुणांमध्ये चांगलाच उत्साह आहे. मात्र लसीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे लसीकरणाची माेहीम प्रभावित हाेत ...

डाेसच्या मर्यादित उपलब्धतेने लसीकरण प्रभावित
नागपूर : लसीकरणासाठी नागपूरवासी तयार आहेत. विशेषत: तरुणांमध्ये चांगलाच उत्साह आहे. मात्र लसीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे लसीकरणाची माेहीम प्रभावित हाेत आहे. डाेस उपलब्ध नसल्याने शुक्रवारी शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यासाठी ४० हजार डाेस उपलब्ध करण्यात आले. यातील ५० टक्के डाेस महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील ११६ केंद्रांवर लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित केंद्रावर काेविशिल्डचे डाेस देण्यात येणार आहेत.
नागपूर शहरात आतापर्यंत सहा लाख २२ हजार ३०६ नागरिकांना लसीचा पहिला डाेस देण्यात आला; तर एक लाख ९७ हजार ३० लाेकांना दुसरा डाेस लावला गेला. आतापर्यंत एकूण आठ लाख १९ हजार ३३६ डाेस देण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जाेशी यांनी सांगितले, शहरातील सर्व केंद्रांवर १८ वर्षांवरील लाेकांना डाेस देण्यात येईल. सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरणाचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. ऑनलाईनसह ऑफलाईन नाेंदणीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यातील मेडिकल काॅलेज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, इंदाेरा व प्रभाकरराव दटके महाल राेग निदान केंद्रावर काेव्हॅक्सिनचे डाेस देण्यात येत आहेत.
नागपुरात लसीकरणाची स्थिती (२४ जूनपर्यंत)
पहिला डोस
आराेग्यसेवक - ४६,१७५
फ्रंटलाईन वर्कर - ५३,२७५
१८ वर्ष वयाेगट - १,०७,८५३
४५ वर्ष वयाेगट - १,४६,९३५
४५ आजारी - ८५,४९९
६० वयाेगटातील सर्व नागरिक १,८२,५६९
एकूण : ६,२२,३०६
दूसरा डोस
आराेग्य सेवक - २४,९४८
फ्रंट लाईन वर्कर - २१,७१९
१८ वर्ष वयाेगट - ७५०२
४५ वर्षे वयाेगट - ३६,९३७
४५ आजारी - २०,५५५
६० वरील सर्व नागरिक - ८५३६
एकूण - १,९७,०३०
एकूण लसीकरण - ८,१९,३३६