दिवसभरात ७६६ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:37+5:302021-04-04T04:08:37+5:30
गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात शनिवारी (दि. ३) दिवसभरात ७६६ नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय ...

दिवसभरात ७६६ जणांचे लसीकरण
गाेंडखैरी : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात शनिवारी (दि. ३) दिवसभरात ७६६ नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. राैनक भाेळे यांनी दिली.
गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) प्राथमिक आराेग्य केंद्रातर्गत एकूण सहा उपकेंद्र असून, या सहाही उपकेंद्रात लसीकरणाची साेय करण्यात आली आहे. आराेग्य केंद्रासह या सहाही उपकेंद्रात दिवसभरात ७६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक रांगेत अधिक काळ उभे राहू नये तसेच इतरांना उन्हाचा त्रास हाेऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली हाेती, शिवाय त्यांना टप्प्याटप्प्याने बाेलावण्यात आले हाेते. यासाठी आशासेविका, एफएलसीआरपी, सीआरपी, बँक सखी यांनी ४५ ते ५९ वयोगटातील तसेच ६० वर्षांवरील नागरिकांच्या घरी जाऊन सूचना दिल्या हाेत्या. प्रकल्प संचालक विवेक इलमे यांनी लसीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. दिवसभरात गोंडखैरी येथे १६६, कळंबी उपकेंद्रात १४९, उपरवाही उपकेंद्रात १००, लिंगा उपकेंद्रात १४१, सोनेगाव उपकेंद्रात १०७ व फेटरी उपकेंद्रात १०३ जणांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. रौनक भोळे यांनी दिली. या माेहिमेत डाॅ. रौनक भोळे, आरोग्य सहायक संजय डायरे, अश्विनी वैद्य, द्राैपदी ठाकरे, प्रीती हावरे, उषा मेहेरे, सरिता झोडापे, संगीता पंचभावे, महल्ले, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशासेविका सहकार्य करीत आहेत.