चिचाेली येथे ४५ ज्येष्ठांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:39+5:302021-03-07T04:08:39+5:30

खापरखेडा : चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्र येथे काेविड लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आराेग्य केंद्रात शुक्रवारी ...

Vaccination of 45 senior citizens at Chichaeli | चिचाेली येथे ४५ ज्येष्ठांचे लसीकरण

चिचाेली येथे ४५ ज्येष्ठांचे लसीकरण

खापरखेडा : चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्र येथे काेविड लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आराेग्य केंद्रात शुक्रवारी पहिल्याच दिवशी ४५ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री पेठकर, डाॅ. ऋचा वाघ, तालुका आराेग्य पर्यवेक्षक मधुकर साेनुने यांच्या उपस्थितीत ज्येष्ठांना लस टाेचण्यात आली. यावेळी चिचाेलीचे सरपंच पुरुषाेत्तम चांदेकर, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी उपस्थित हाेते. सरपंच पुरुषाेत्तम चांदेकर यांना काेविडची लस देऊन माेहिमेला सुरूवात करण्यात आली. या लसीकरणात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर आजार असलेल्या अतिजाेखमीच्या रुग्णांचा समावेश हाेता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काेविड लसीकरणाला सुरुवात झाली असून, नाेंदणीनुसार ज्येष्ठांना लस देण्यात आली. या केंद्रात साेमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी लसीकरण करण्यात येईल, प्रत्येक लाभार्थ्यांनी नाेंदणी करून लस घ्यावी, असे आवाहन डाॅ. जयश्री पेठकर यांनी केले. लस घेतल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्येष्ठांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवून साेडण्यात आले. या माेहिमेत राजीव नयन देशपांडे, धनंजय ढोके, विद्या मोंढे, जयंत गोटे, नरेंद्र भागडकर, मोनिका लांजेवार, विश्वेश्वर महल्ले, अनंत मुडानकर, अरविंद मेश्राम, लीना बांडेबुचे, पूजा तिवारी, डॉ. अब्दुल शेख, वैशाली लोहकरे, सपना मोटघरे, संध्या सिरसाम, अनिता उज्जैनवार, सुरेश वंजारी, रोशन केवटे, युवराज राठाेड, प्रदीप फुगे आदींचा सहभाग हाेता.

Web Title: Vaccination of 45 senior citizens at Chichaeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.