रुयाड येथे ३१ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:10+5:302021-03-14T04:09:10+5:30
कुही : मांढळ (ता. कुही) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रुयाड (बांध) (ता. कुही) येथील उपकेंद्रात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात ...

रुयाड येथे ३१ नागरिकांचे लसीकरण
कुही : मांढळ (ता. कुही) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रुयाड (बांध) (ता. कुही) येथील उपकेंद्रात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या दिवशी ३१ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. तालुक्यातील चारही प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत एकूण ३,२५० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रुयाड (बांध) येथील लसीकरण प्रारंभप्रसंगी सरपंच नेहा ढेंगे, उपसरपंच फुलचंद बोरकर, सचिव विजयकुमार लिंगायत उपस्थित हाेते. काेराेना लस घेतल्यानंतर काेणताही त्रास जाणवला नाही, अशी माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पांडुरंग बुराडे, रा. वडेगाव यांनी दिली. यावेळी रुयाड येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश मोहतुरे, भावना मोहनकर, शीतल गेडेकार, माधुरी कामठे, वैशाली गोरबडे, सुहास मोहतुरे, दीपक गेडेकार, रंजना डहारे आदी नागरिक उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यात काेराेना लसीकरणाबाबत युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे. पंचायत समितीचे उपसभापती वामन श्रीरामे, आकोलीचे सरपंच गजानन धांडे यांनीही लस घेतल्याचे सांगितले.