ग्रामीण भागात पाहिल्याच दिवशी ३ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:59+5:302021-06-20T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची ...

ग्रामीण भागात पाहिल्याच दिवशी ३ हजार नागरिकांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी २९२७ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
. नागपूर जिल्ह्यामध्ये ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नागपूर शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी या गटामध्ये २९२७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. ४५ ते ६० या गटांमध्ये ३९२, तर ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना १२६ तर दुसऱ्या टप्प्यात ४५ ते ६० वयोगटातील २८८ तर ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्या गटातील दुसऱ्या टप्प्यात ४०७ अशा दिवसभरात एकूण ४३७० लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.