१४५ केंद्रांवर आज लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:45+5:302021-07-17T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीचे डोस उपलब्ध होताच शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी शहरात ३४,५०१ ...

१४५ केंद्रांवर आज लसीकरण ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लसीचे डोस उपलब्ध होताच शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी शहरात ३४,५०१ जणांना लस देण्यात आली. या २२,१५९ जणांनी पहिला डोस घेतला. तर १२,३४२ दुसरा डोस घेतला. तसेच शनिवारीसुद्धा लसीकरण हाेणार असून १४५ केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येईल. १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या शासकीय केंद्रांवर नि:शुल्क लस दिली जात आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत केंद्र सुरू राहील.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, शहरात तीन केंद्रांवर को-व्हॅक्सीन तसेच उर्वरित केंद्रांवर कोविशिल्ड लावली जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार १२ आठवड्यानंतर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे आता दुसरा डोस लाावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
बॉक्स
गर्भवती महिलांचे लसीकरण
महापालिकेतर्फे शुक्रवारी गर्भवती महिलांसाठी विशेषत्वाने लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मनपाच्या पाचपावली सूतिकागृहात या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते. याावेळी गर्भवती महिलांना मार्गदर्शनही करण्यात आले.