उत्तम शेवडे बसपातून निलंबित : बसपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:01 AM2020-01-11T00:01:32+5:302020-01-11T00:02:42+5:30

बहुजन समाज पार्टी (बसपा) तील जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि बसपाचे मीडिया प्रभारी अशीच ज्यांची ओळख असलेले उत्तम शेवडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Uttam Shewade suspended from BSP: Dispute over BSP again | उत्तम शेवडे बसपातून निलंबित : बसपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

उत्तम शेवडे बसपातून निलंबित : बसपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देआरोप-प्रत्यारोपाचे सत्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) तील जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये गणले जाणारे आणि बसपाचे मीडिया प्रभारी अशीच ज्यांची ओळख असलेले उत्तम शेवडे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे बसपात अजूनही सर्व काही व्यवस्थित नसल्याचे दिसून येते.
बसपातर्फे जिल्हा प्रभारी नागोराव जयकर यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्या आदेशानुसार शुक्रवारी १० जानेवारी रोजी उत्तम शेवडे यांना पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे. यामध्ये शेवडे यांना स्वयंघोषित मीडिया प्रभारी असेही म्हटले आहे.
मागील काही वर्षात बसपात ऐन निवडणुकीनंतर पक्षात मोठे वादळ होत असल्याच्या घटना नागपूर व विदर्भात सातत्याने होत आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या लोकसभा उमेदवारालाच निलंबित करण्यात आले. त्याने प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ नेत्यांवर आर्थिक देवणघेवाणीचे आरोप केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर खुद्द प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना निलंबित करण्यात आले. त्यांनीच असेच काहिसे आरोप केले होते. तसेच सत्र पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येते. उत्तम शेवडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या जि.प. निवडणुकीच्या निकालानंतर केलेले वक्तव्य त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरले आहे.

पक्षविरोधी कृत्यामुळे शेवडे यांना पक्षातून काढले
जि.प. निवडणूक न लढण्याचा निर्णय हा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा होता. त्यांच्या आदेशानुसारच पक्षाने काम केले. असे असताना त्यासंदर्भात वक्तव्य करण्याचा शेवडे यांना काहीही अधिकार नव्हता. ते कुठल्याही पदावर नाहीत. ते स्वयंघोषित मीडिया प्रभारी म्हणून मिरवतात. असे असतानाही त्यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठी बसपा निवडणुक लढवली नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. हे वक्तव्य म्हणजे पक्षाविरुद्ध केलेले कृत्य असून असे कृत्य खपवले जाणार नाही. त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले.
संदीप ताजने
प्रदेशाध्यक्ष, बसपा

नियुक्ती पत्रासाठी मागितले एक लाख रुपये
मी कुठलेही पक्षविरोधी कृत्य केलेले नाही. बसपा निवडणुकीत नसल्याने काँग्रेसला फायदा झाला, इतकेच बोललो. ते चुकीचे नाही. खरी बाब अशी आहे की, राज्यातील व नागपुरातील पक्षाची नव्यानेच कार्यकारिणी गठित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष ताजने हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी त्यांनी मला मीडिया प्रभारी घोषित केले होते. त्यानुसार मी कामही पाहत होतो. परंतु नियुक्ती पत्रासाठी प्रदेशाध्यक्ष ताजने यांनी मला एक लाख रूपयाची मागणी केली. मी ती देण्यास नकार दिला म्हणून माझ्यावर ही कारवाई करण्यात आली.
उत्तम शेवडे

Web Title: Uttam Shewade suspended from BSP: Dispute over BSP again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.