शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नागपूर मेट्रोसाठी सोलर सिग्नलचा करणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:50 AM

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने नागपुरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देविजेवर चालविण्याची व्यवस्था सक्षम बॅटरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने नागपुरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या आधुनिक सोलर सिग्नलच्या माध्यमातून शहरातील रस्ते वाहतुकीत येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न नागपूर मेट्रो करीत आहे.

नागपुरात निर्मितीसोलर सिग्नल पूर्णपणे नागपुरात तयार केले जाणार असून मेट्रो प्रकल्पासाठी फायद्याचे ठरणार आहे. उच्च दर्जाच्या या सोलर सिग्नलमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी लॉन्ग परफॉर्मन्ससाठी पुरेपूर उपयुक्त ठरणार आहे. सोलर सिग्नल नैसर्गिकरीत्या स्वयंचलित राहणार आहे. आवश्यकतेनुसार त्यात योग्य ते बदल करता येतील. गरज भासल्यास विजेवर देखील चालवता येतील. त्यासाठी प्रोग्रामिंगची व्यवस्था असेल. तसेच सोलर सिग्नलला चालविणारे सॉफ्टवेअर देखील दिशानिर्देशानुसार बदलता येऊ शकेल.

विषम परिस्थितीत काम करण्याची क्षमतासोलर सिग्नल १६ वेगवेगळ्या प्रकारे हाताळता येणार आहे. यात मॅन्युअल आणि आॅटोमोड अशा मुख्य दोन प्रकारची सेटिंग आहे. सामान्य माणसालादेखील त्याचे संचालन करता येईल. विशेष म्हणजे या उपकरणात जीपीएस प्रणाली असून या माध्यमानेसुद्धा सिग्नलचे संचालन होणार आहे. अक्षांश व रेखांशच्या आधारे सिग्नलमध्ये बसविण्यात आलेल्या रियल टाइम घड्याळातील वेळ ठरविण्यात येते. सोलर सिग्नलमध्ये तब्बल १६ तास चालणारी १०० वॉट क्षमता असलेली बॅटरी आहे. सिग्नलची उंची जमिनीपासून १२ फूट असून त्यामुळे सिग्नल रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस अगदी सहजपणे पडतात. सिग्नल ट्रॉलीवर बसविण्यात आले आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. सिग्नल आणि ट्रॉलीचे एकत्रित वजन ३०० किलोपेक्षा जास्त आहे. कुठल्याही हवामानात आणि विषम परिस्थितीत काम करण्याची सिग्नलची क्षमता आहे. ते अरुंद रस्त्यावर अतिशय लाभदायक आहेत.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन