मास्क वापरा, काटोल सुरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:05+5:302021-01-03T04:10:05+5:30

काटोल : काटोल शहरात कोरोनाची साखळी अद्याप कायम आहे. मात्र नागरिकाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून ...

Use a mask, keep the cuticle safe | मास्क वापरा, काटोल सुरक्षित ठेवा

मास्क वापरा, काटोल सुरक्षित ठेवा

काटोल : काटोल शहरात कोरोनाची साखळी अद्याप कायम आहे. मात्र नागरिकाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आहे. शुक्रवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काटोल न.प.,आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शहरात संयुक्त तपास मोहीम राबवित विना मास्क वावरणाऱ्या ३९ नागरिकांवर कारवाई करीत दंड ठोठावला. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत असले तरी काटोलमध्ये अद्याप संक्रमण कायम आहे. शहरात रोज रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी मोडित काढण्यासाठी ठोस उपायोजनांची गरज होती. याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कृष्णा मानकर, विजयकुमार आत्राम, संजय वानखेडे, विनोद बारस्कर, अरुण राऊत, धीरज मानेकर, चंद्रकांत चरडे, राजेंद्र वानखडे, वैकुंठ चचाने,पोलीस कर्मचारी एस.हजारे व एम.राऊत सहभागी झाले होते.

Web Title: Use a mask, keep the cuticle safe