शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा पिकासाठी गांडुळ खताचा वापर : ७०० संत्रा झाडांपासून चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 21:49 IST

निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आहे.

ठळक मुद्देउच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांचा अभिनव प्रयोग

विजय नागपुरेआॅनलाईन लोकमतनागपूर : निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आहे.बीएस्सी (अ‍ॅग्रीकल्चर) पदविकेपर्यंत शिक्षण झालेले अरुण घोंगे यांच्याकडे २० एकर शेती असून त्यापैकी १२ एकरात १० वर्षांची ७०० संत्रा झाडे, १५० मोसंबी व १५० लिंबूची झाडे आहेत. यात फक्त शासकीय योजनेतून ३०० झाडांची लागवड केली असून ती झाडे सध्या चार वर्षांची आहे. तर संपूर्ण बागायत शेती ठिबक सिंचनावर ओलित होत असून त्यासाठी शेतीत दोन विहिरी खणण्यात आल्या आहे. तर शेतीसाठी लागणाऱ्या शेणखतासाठी १० गाई पाळल्या असून त्यांच्यापासून मिळणारे शेणखत व काही बाहेरून असे २० ट्रकच्या जवळपास दरवर्षी संत्राझाडांना शेणखत देण्यात येते.तसेच मागील सात वर्षांपासून गांडुळ खत प्रकल्प शासकीय सहकार्यातून सुरू केला असून त्या व्यतिरिक्त स्वखर्चातून अधिकचे युनिट तयार केले. जमीन हलक्या स्वरूपाची असल्याने कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागत असल्याचे अरुण घोंगे यांनी सांगितले.संत्रा झाडांना बुरशी लागू नये म्हणून वेळोवेळी ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करणे सुरू असते. सध्या दरवर्षी दोन लाखांच्या जवळपास खर्च होत असून चार लाख रुपयांचे उत्पन्न होत असते. परंतु निसर्गाच्या अवकृपेने कधी कधी संपूर्ण संत्रा उत्पादनच हातून जात असल्याने केलेला खर्चही वसूल होत नाही, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.संत्र्याला हमीभाव मिळावाशेतमालासह संत्र्याला हमीभाव जाहीर करावा तसेच बाहेर राज्यात संत्रा विकण्यासाठी संत्रा वाहतुकीत विम्यासहीत शासनाकडून सबसिडी मिळावी. जेणेकरून अधिक उत्पादन घेणारे शेतकरी बाहेर राज्यात संत्रा विकून जास्तीचा भाव मिळवू शकतील. 

अरुण घोंगे 

शेतकरी, बोरगाव (धुरखेडा).

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर