वेगळ््या विदर्भासाठी सर्व आयुधे वापरा

By Admin | Updated: November 16, 2016 02:45 IST2016-11-16T02:45:46+5:302016-11-16T02:45:46+5:30

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

Use all the units for different Vidarbha | वेगळ््या विदर्भासाठी सर्व आयुधे वापरा

वेगळ््या विदर्भासाठी सर्व आयुधे वापरा

श्रीनिवास खांदेवाले : ‘विदर्भ राज्य एक शोध’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे वेगळे विदर्भ राज्य मिळविण्यासाठी वैदर्भीयांनी आवश्यक त्या सर्व आयुधांचा वापर करावा, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व विदर्भवादी नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक यांनी लिहिलेल्या ‘विदर्भ राज्य एक शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी हिंदी मोरभवन येथे पार पडले. या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. अशोक गोेळघाटे, ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी, नाथे प्रकाशनचे संस्थापक संजय नाथे उपस्थित होते. ‘विदर्भ राज्य एक शोध’ या पुस्तकावर भाष्य करताना प्रा. अशोक गोेळघाटे म्हणाले, वेगळया विदर्भाच्या चळवळीला बौद्धिक बळ पुरविणारे हे पुस्तक आहे. वेगळया विदर्भाची आपली मागणी किती सत्य आहे, हे लोकांना पटवून देण्यात या पुस्तकाची खूप मदत होईल. ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे त्यांनी वेगळया विदर्भाचे स्वप्न दाखवून मते मागितली आहेत. आता जर त्यांनी वेगळा विदर्भ दिला नाही तर जनताच त्यांना सत्तेतून मुक्त करेल. येत्या काळात जर या मागणीची दखल घेतली गेली नाही तर सत्तापक्षाला मतदानच करू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय नाथे यांनीही या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून आपले विचार मांडले. लेखक अनिल वासनिक यांनी प्रास्ताविकातून या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका विशद केली. मधुकर गजभिये यांनी विदर्भातील भूमिपुत्रांना समर्पित एक गीत सादर केले. संचालन राजकुमार वंजारी यांनी तर आभार डॉ. दिलीप तांबडकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Use all the units for different Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.