शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

८१ वर्षांच्या वृद्ध महिलेस दिला ‘अप्पर बर्थ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:04 PM

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये अजब कारभार सुरू असून ज्येष्ठ नागरिकांना खालील बर्थ देण्याऐवजी ते वाचवून वरील बर्थ देऊन त्यांची थट्टा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये अजब कारभार सुरू असून ज्येष्ठ नागरिकांना खालील बर्थ देण्याऐवजी ते वाचवून वरील बर्थ देऊन त्यांची थट्टा करण्यात येत आहे. नागपुरातून जबलपुरला जाणाऱ्या एका ८१ वर्षाच्या वृद्ध प्रवासी महिलेस अप्पर बर्थ देऊन रेल्वे प्रशासनाने आपला अजब कारभार उघडकीस आणला आहे. विजया डबली (८१) या ज्येष्ठ महिला प्रवासी यांनी आपला मुलगा प्रवीण डबलीसह १८ मार्चला नागपूरवरून जबलपूरला जाण्यासाठी १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बुक केले. त्यांचा पीएनआर क्रमांक ८६१७०३३११४ होता. यात त्यांना एस ६ कोचमध्ये ३० व ३२ क्रमांकाचा बर्थ देण्यात आला. यात विजया डबली यांना साईड अप्पर बर्थ देण्यात आला. ज्या वेळी तिकीट बुकिंग करण्यात आली त्यावेळी जवळपास १४० ते १४५ बर्थ रिकामे असल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात येत होती. त्यांनी तिकीट रद्द केले, त्यांना तिकिटाची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आरक्षण कार्यालयात काऊंटरवरून तिकीट खरेदी केले. येथेही ५९ वेटिंग होते. एवढेच नव्हे तर जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसचे २१ मार्चचे परतीचे तिकीट काढले. या दरम्यान १०४ बर्थ उपलब्ध असल्याची माहिती वेबसाईटवर दिल्यानंतरही विजया डबली यांना २७ क्रमांकाचा अप्पर बर्थ देण्यात आला. त्यांनी आरक्षणाच्या फॉर्ममध्ये ज्येष्ठ नागरिक असे नमूद केले होते. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण डबली यांनी या घटनेबाबत सांगितले की, तत्काळ रिझर्व्हेशनपूर्वी प्रवाशांना बर्थबाबत विचारणा केल्यास प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत.

 

 

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे